आमदार राजेश पाटील यांनी मतदार संघातील पूरस्थिती व नदीगाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2023

आमदार राजेश पाटील यांनी मतदार संघातील पूरस्थिती व नदीगाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज

विधान सभेत प्रश्न मांडताना आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        आमदार राजेश पाटील यांनी चंदगड  मतदार संघातील पूरस्थिती व यासाठी कारणीभूत होणारा नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत आज आवाज उठवला. 

     चंदगड विधानसभा मतदारसंघात तीन नद्या प्रवाहित आहेत. यामध्ये हिरण्यकेशी,घटप्रभा, ताम्रपर्णी या तिन्ही नद्यांचे पाणी गेल्या वीस पंचवीस दिवसाच्या पावसामुळे चौथ्या ते आठव्या दिवशी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन दोन्ही बाजूची शेती पाण्याखाली गेली. यामध्ये भात व ऊसांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उदारणात आज चंदगड तालुक्यातच साधारण 5500 हेक्टर  क्षेत्र यामुळे बाधित झाले आहे. सन 2019 -2021 ला सुद्धा पूर परिस्थिती उद्भवली होती आणि अनेक घरांची पडझड व शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

    2019 पासून आज तागायत पाटबंधारे विभागामार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नदीतला गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे . लवकरच नदीतला गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करून दरवर्षी उद्भवणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची विनंती आमदार राजेश पाटील साहेब यांनी विधानसभेत केली.तसेच अतिवृष्टीमुळे किणी (ता. आजरा) येथे घराची पडझड होऊन दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. आमदार राजेश पाटील यांनी  दोन्ही महिलेच्या कुटुंबियांना तातडीची मदत व आधार देण्याकरिता  शासनाकडे विनंती केली. या विनंतीला शासनाने सकारात्मका दर्शवली आहे.

No comments:

Post a Comment