प्राचार्य बेळगावकर यांना झुंज व सुडाग्णी पुस्तके प्रदान करताना के. जे. पाटील, सोबत प्राध्यापक वर्ग |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कथा' या साहित्य प्रकाराची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कथाकार कल्लाप्पा जोतिबा पाटील (कालकुंद्री) हे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एल. बेळगावकर होते. पाहुण्यांचा परिचय विनायक कांबळे यांनी करून दिला. यावेळी लेखक के. जे. पाटील यांनी कथा साहित्य प्रकाराबद्दल सविस्तर माहिती सांगितली. स्वलिखित तलफ, लचका, झुंज या कथासंग्रहांचा संदर्भ व कथासंग्रहातील काही भागांचे अभिवाचन करून स्पष्टीकरण दिले. त्यांनी आपली झुंज व सुडाग्नी ही पुस्तके विद्यालयाला प्रदान केली. या प्रसंगी उच्च माध्यमिक विभागाकडील प्रा. डी. एम. तेऊरवाडकर, डी. एस. बामणे, व्ही. जी. कांबळे, रवी पाटील, सीमा पाटील आदींची उपस्थिती होती. प्रा अनिल गुरव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment