|
राजीव गांधी पतसंस्थेचे आजारी कर्मचारी भोगूलकर यांची पत्नी व मुलगी कडे धनादेश देताना चेअरमन शाखा चेअरमन संचालक आदी.
|
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
राजीव गांधी पतसंस्था मर्यादित कुदनुर (ता. चंदगड) यांच्यावतीने संस्थेतील आजारी व मयत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देऊन कुटुंबीयांना मदत केली आहे.
|
मयत अआंबेवाडकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत देताना संस्थेचे पदाधिकारी. |
पतसंस्थेचे पिग्मी एजंट अरूण रवळू भाेगुलकर रा. बागिलगे हे आजारी असून त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांच्या उपचारासाठी रु. ५० हजार चा धनादेश भोगूलकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला. तर संस्थेचे दुसरे कर्मचारी मारुती भिमराव आंबेवाडकर (रा. कुदनूर) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्याही कुटुंबियांसाठी मदत म्हणून संस्थेने ५० हजार रुपयांच्या धनादेश आंबेवाडकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करून संस्थेचे कर्मचाऱ्यांप्रती आपली सहवेदना व्यक्त केली. यावेळी संस्थेचे चेअरमन पी बी पाटील, व्हा. चेअरमन अशोक गवंडी, माजी चेअरमन सुखदेव शहापूरकर, शाखा चेअरमन शिवाजी नौकुडकर संचालक कृष्णा मांडेकर व्यवस्थापक नामदेव कोकितकर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment