इब्राहिमपूरचे हाॅटेल व्यावसायिक यशवंत हरेर यांचा 'महाराष्ट्र हॉटेल सम्राट' पुरस्काराने होणार सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2023

इब्राहिमपूरचे हाॅटेल व्यावसायिक यशवंत हरेर यांचा 'महाराष्ट्र हॉटेल सम्राट' पुरस्काराने होणार सन्मानचंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 
    परिस्थितीने हॉटेलात वेटर झालेल्या ईब्राहीपुर ता.चंदगड येथील यशवंत रामु हरेर यानी याच व्यवसायात क्रांती केली असून अलिबाग सारख्या पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असलेल्या ठिकाणी स्वतःचे सुसज्ज हॉटेल सुरू केले.या व्यवसायाकडे ते चॅलेज म्हणून बघतात . ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी धडपडतात. खवय्यांची इच्छा पूर्ण करतात.यशवंत हरेर यांचा वेटर ते हॉटेल मालक " असा केलेला प्रवास थक्क करणारा आहे.या परिश्रमाचे फलित म्हणून त्याना कोकणनामा प्रतिष्ठानचा "महाराष्ट्र हॉटेल सम्राट " या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अलिबाग येथे शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता  हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे
      यशवंत हरेर यांची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने उदरनिर्वाहासाठी १९९२साली ते घरातून बाहेर पडले.सूरवातीला त्यानी अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या कँटीन मध्ये वेटरचे काम स्विकारले. लहानपणापासूनच हरेर हे चौकस बुध्दीचे असल्याने त्यानी वेटरचे काम करत असताना हाॅटेल व्यवसायाची बारकाईने माहीती घेतली.या दरम्यान वेटर,कॅप्टन व मॅनेजरपदावर काम केल्यानंतर स्वताच हाॅटेल चालवावे असा आत्मविश्वास निर्माण झाला.सुरवातीला दोन तीन हाॅटेल चालवायला घेतली.दोन हाॅटेल चालवायला घेऊन ती डेव्हलप केली.त्यानतर अथक प्रयत्नाने गुरूप्रसाद हे स्वमालकीचे हाॅटेल उभे केले.अलिबाग शहरात या हाॅटेल ची सध्या जोरदार चर्चा असून अल्पावधीत खवय्यांसाठी सुंदर चवीचे ठिकाण बनले आहे.अलिबाग मध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी  जागा उपलब्ध झाल्याने चांगल्या हॉटेलचे स्वप्न साकार करणे त्याना सोपे झाले आहे . एकाचवेळी २०० लोक विविध दालनात बसून भोजनाचा आस्वाद घेऊ शकतील , अशी बैठक व्यवस्था आहे . खास पार्टी हॉल आहे . पदार्थ इतके दर्जेदार आहेत की मुंबई-पुणे येथून १००-१०० कि.मी.चा प्रवास करून माणसं अलिबागला जेवायला येत आहेत . गोमंतकीय पध्दतीची ' फिश थाळी " हे तर गुरूप्रसाद हाॅटेल चे खास वैशिष्ट्य आहे . व्हेज , नॉनव्हेज , साऊथ इंडियन , चायनीज,तपेटा स्पेशल कबाब,मटण वडे,चिकन वडे,तंदुरी चिकन वडे,या  शिवाय मालवणी,आगरी,कोकणी पध्दतीचे रूचकर जेवणही  ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.वेटर ते हाॅटेल मालक असा खडतर प्रवास करून हाॅटेल व्यवसायात नाव कमावलेले हरेरे यांचे कार्य हाॅटेल व्यवसायातील नव उद्योजकांना आदर्शवत ठरले आहे. मोठ्या कष्टातून हाॅटेल विश्वात स्वताचा ब्रॅण्ड निर्माण करणारे हॉटेल गुरुप्रसादचे मालक यशवंत हरेर याना २०२३ या सालाचा महाराष्ट्र हॉटेल सम्राट या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
           महाराष्ट्र हॉटेल सम्राट पुरस्काराचे वितरण लायन्स हेल्थ फाऊंडेशन , अलिबागचे उपाध्यक्ष , उद्योजक नितीन अधिकारी , ब्रह्मा - विष्णू महेश चित्रपटगृहाचे मालक गजेंद्र दळी , रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी , नाट्य - चित्रपट अभिनेते व साहित्यिक शरद कोरडे , पत्रकार-साहित्यिक उमाजी केळुसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment