तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2023

तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

 

तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी करतानाचा क्षण

तेऊरवाडी /  सी. एल. वृत्तसेवा

         तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय तेऊरवाडी (ता. चंदगड) या शाळेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

      मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांनी लो टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. एम. ए पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी विचार व्यक्त केले यावेळी टि. एम. पवार, प्रभाकर गावडे, गुलाब पाटील याच्यासह ब्रम्हानंद बुच्चे, दयानंद पाटील, तानाजी पाटील, यल्लापा पाटील आदि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment