![]() |
महादेव शिंदे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोनेवाडी (ता. चंदगड) येथील महादेव तुकाराम शिंदे (वय -५८) यांचे सोमवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाच वाजता पंढरपूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह मोठा परिवार आहे.
अंगणवाडी सेविका माधवी शिंदे यांचे ते पती होत. पांढरी देवी दूध संस्थेचे माजी चेअरमन, चंदगड येथील शिक्षक पतसंस्थेचे माजी मॅनेजर व कोनवाडी सेवा संस्थेचे ते संस्थापक संचालक होते.
No comments:
Post a Comment