ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठी खुशखबर...! - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2023

ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठी खुशखबर...!कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

         चंदगड तालुक्यात  १ जानेवारी  ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासोबतच तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमधील विविध कारणास्तव रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

      महाराष्ट्र राज्यात एकूण २३५९ यातील कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या ८९ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी सर्वाधिक २२ ग्रामपंचायती  चंदगड तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील ४८ पोटनिवडणुकांपैकी सर्वाधिक १० ग्रामपंचायती सुद्धा चंदगड तालुक्यातीलच आहेत.

      निवडणुकीत नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यासाठी  १६ ते २०/१०/२०२३ वेळ सकाळी ११ ते ३ अशी होती. तथापि संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देशन पत्र  तसेच घोषणापत्र (ॲफिडेव्हीट) भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. या प्रक्रियेसाठी अधिक वेळ लागत असल्यामुळे निवडणूक आयोगाने नामनिर्देशन भरण्यासाठी असलेली वेळ ११ ते ३ ऐवजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवली आहे. यामुळे नामनिर्देशन पत्र भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

      निवडणूक होत असलेल्या २२ गावात आंबेवाडी, अमरोळी, बुझवडे, भोगोली, गणूचीवाडी, जट्टेवाडी, कडलगे खुर्द, कलिवडे, कानूर खुर्द, कोदाळी, कुरणी, लाकूरवाडी, माणगाव, मिरवेल, मुरकुटेवाडी, सडेगुडवळे, शिरोली-सत्तेवाडी, शिवणगे, तांबुळवाडी, तुर्केवाडी, उमगाव, उत्साळी तर  पोटनिवडणूक होत असलेल्या गावांमध्ये चिंचणे, कामेवाडी, ढोलगरवाडी, वाघोत्रे, मांडेदुर्ग, कागणी, बुक्किहाळ, शिरोळी खुर्द, बोंजुर्डी, पुंद्रा या १० गावांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment