तुडये येथे श्री रामलिंग वाचनालयात विविध उपक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2023

तुडये येथे श्री रामलिंग वाचनालयात विविध उपक्रम संपन्न

 

तुडये येथे श्री रामलिंग मोफत वाचनालयात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना विठ्ठल मोहिते

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        श्री रामलिंग मोफत वाचनालय तुडये (ता. चंदगड) येथे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन १५ ऑक्टोबर २०२३ हा वाचन प्रेरणादिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित डॉ. ए. पी. जे.  अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पुजन हभप बसवंत भरमाना झाजरी यांनी केले. तसेच वाचनाचे महत्व या विषयावर सेवानिवृत शिक्षक शिवाजी नार्वेकर यांनी  मागदर्शन केले. यावेळी आयोजित ग्रंथ  प्रर्दशनाचे उद्गघाटन वाचनालयाने उपाध्यक्ष मारुती लक्ष्मण पाटील यांनी केले. 

       कार्यक्रमांचे सुत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष  विठ्ठल मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाला परशराम पाटील, जोतीबा बसरीकट्टी, सतिश मोहिते, सटूप्पा मोहिते, परशराम चौगुले, उतम पाटील, अजित  मोहिते मारुती, रामलिग  पाटील  तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, वाचकवर्ग  उपस्थित होता.  आभार ग्रंथपाल सौ. सुषमा  मोहिते यांनी मानले.

No comments:

Post a Comment