चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
प्रत्येकाने सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला हवी. जेवढी लवकर गुंतवणूक करावी तेवढी ती किफायतशीर ठरते. शिवाय कमी गुंतवणूक करून अधिक लाभाची संधी मिळते. गुंतवणूक करण्याआधी बचतीची व काटकसरी ची गरज असते. अनेक कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करण्यापेक्षा नामांकित कंपन्यांच्या विश्वासार्हतेची खातर जमा करून तिथेच गुंतवणूक करणे अधिक श्रेयस्कर ठरते. गुंतवणूक करण्या पूर्वी गुंतवणुकीतील संभाव्य धोके विचारात घेणे गरजेचे असते. भविष्य काळातील आपल्या सुरक्षित जीवनाची हमी हवी असेल तर बाजारातील कंपन्यांचे अद्ययावत ज्ञान प्राप्त करून घेणे गरजेचे ठरते असे प्रतिपादन गौरी गीत यांनी केले. त्या येथील माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वेबिनार मध्ये बोलत होत्या.
यावेळी त्यांनी एम. एफ. आय. सेबी या संस्थांची माहिती दिली तसेच बी. एस. सी., एन. एस. इ. मधील कामकाजाच्या पद्धती विषयी सुद्धा सविस्तर माहिती विशद केली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या उज्वल भविष्यासाठी योग्य व काटेकोर नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. डॉ. एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविकातून वेगवेगळ्या प्रकारात गुंतवणूक करण्याचे मार्ग वआर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी यशस्वी कसे व्हावे. याचे मार्गदर्शन होण्यासाठी या प्रशिक्षण वेबिनारचे आयोजन केल्याचे सांगितले. या वेबिनार साठी रुही लोढा यांनी तंत्रसहाय्य केले तर व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment