महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक फार्मासिस्ट ‘डे’ साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2023

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक फार्मासिस्ट ‘डे’ साजरा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
‌‌          महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये फार्मासिस्ट डे संस्थापक अध्यक्ष महादेवराव वांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी फार्मासिस्ट डेचे महत्व कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. सी. महांतेश यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मोहन परब व पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एस. पी. गावडे, श्रीमती एस. आर. देशपांडे उपस्थित होत्या.
        बी. एड. विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ग. गो. प्रधान यांनी ``फार्मासिस्ट हा एक मार्गदर्शक समुपदेशक तर आहेच. पण त्याचबरोबर देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये त्याची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण व प्रशिक्षण योग्य पद्धतीने पूर्ण करून समाजासाठी आपले योगदान द्यावे.`` 
       फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच जनता विद्यालय तुर्केवाडी व मौजे कारवे येथे ब्लड कॅम्प व आरोग्य विषयक जनजागृतीवर रॅली काढण्यात आली. वैष्णवी पाटील या विद्यार्थीनीने फार्मासिस्टची ओथ दिली.
      यावेळी प्रा. ओमकार जाधव, प्रा. विनायक यादव, प्रा. बिराजदार प्रा. आदित्य कांबळे व इतर सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कुंभार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. एम. एस. घुंगरे यांनी केले. आभार डॉ. निकिता कनबरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment