सुमित पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
आजरा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगट महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत ८०० मीटर व १५०० मीटर धावणे प्रकारात सुमित बंडू पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांने प्रथम क्रमांक पटकावला.
आजरा महाविद्यालय आजराचा विद्यार्थी असलेला सुमित ११ वी वर्गात शिकत आहे. त्याची जिल्हा स्तरासाठी निवड झाली असून तो आजरा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या १५०० मीटर धावणे स्पर्धेत त्यांने तिसरा क्रमांक पटकावला होता. त्याला क्रीडा प्रशिक्षक अभिजीत मस्कर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment