मॅरेथॉन स्पर्धेतील एक क्षण |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किणी (ता. चंदगड) मार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व व मॅरेथॉन स्पर्धेस मोठा प्रतिसाद लाभला. खुल्या वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूर, गडहिंग्लज व चंदगड परिसरातून ४८ निवडक स्पर्धकांनी भाग घेतला. यात संकेत कृष्णा पाटील (कोल्हापूर), चारुदत्त माळी (कुरुंदवाड), कृष्णाई पवार (कार्वे), गौरव व्हनूरकर (कागल), इंद्रयानी पाटील (सुंडी), अथर्व गुरव (तडशीनाळ), गायत्री बिर्जे (किणी), अतुल पाटील (तेउरवाडी), ऋतुजा पाटील (गुडेवाडी), सानिका नागनवाडकर (कोवाड) यांनी अनुक्रमे १ ते १० क्रमांक पटकावले. उतेजनार्थ बक्षीसे अनुक्रमे जोत्सना जोशीलकर, अनुष्का धुरी, दुर्वा पन्हाळकर, सुदर्शन केसरकर, शुभ्रा चांदेकर यांनी पटकावली.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना मान्यवरांसोबत मंडळाचे पदाधिकारी |
यावेळी झालेल्या तालुकास्तरीय ५ किलोमीटर धावणे मॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे अनिकेत अनंत कुट्रे, आकाश सुनील गावडे, बाबू शिवाजी गावडे (सर्व चंदगड), निलेश नंदकुमार पाटील (मौजे कारवे), मोहन वैजू पाटील (किणी) या स्पर्धकांनी बक्षिसे जिंकली.
No comments:
Post a Comment