डेरवण येथील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत किणी ची वेदांती मणगुतकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2023

डेरवण येथील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत किणी ची वेदांती मणगुतकर प्रथम

३००० मीटर चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर हात उंचावून दाखविताना वेदांती मणगुतकर 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

       डेरवण (जि. सिंधुदुर्ग) येथे आज रविवार दि १ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या शासकीय राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत किणी येथील वेदांती बाळाराम मणगुतकर हिने चमकदार कामगिरी बजावली. स्पर्धेतील ३ हजार मीटर चालणे क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने हे अंतर १६ मिनिटे ५० सेकंदात पूर्ण केले. तिची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वेदांती ही किणी, ता चंदगड येथील जयप्रकाश विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला क्रीडा प्रशिक्षक व मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment