चंदगड / सी. एल. वृतसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय मंत्रालयाद्वारे निर्धारित मानक संचालन प्रक्रियेनुसार ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. ' एक तारीख एक घंटा' हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे.
या मोहिमेत प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाऊस असूनही सर्वांनी उत्स्फूर्त श्रमदान केले.
या सामूहिक प्रयत्नामुळे अवघ्या तासाभरात संपूर्ण परिसराला नीटनेटके स्वरूप प्राप्त झाले. यावेळी मोहिमेपूर्वी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
No comments:
Post a Comment