सांगाती पतसंस्थेला ५८ लाखांचा नफा,सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2023

सांगाती पतसंस्थेला ५८ लाखांचा नफा,सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर

सांगाती पतसंस्थेला ५८ लाखांचा नफा,सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर

चंदगड / प्रतिनिधी 
           शिनोळी (ता. चंदगड) येथील 
औद्योगिक वसाहत मधील सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण  चेअरमन हिरामणी कृष्णा तुपारे यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन्न झाली. सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सभासद, हितचिंतक, वीर जवान यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
      प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन  नितीन नारायण पाटील यांनी केले. चेअरमन श्री. तुपारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती देवून संस्था कामकाजात मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानून संस्थेला ५८ लाख ४ हजार ८९६ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगीतले. दि ३१ मार्च २०२३ अखेेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन संस्थेचे सचिव गावडू नारायण पाटील यांनी केले. संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. बाबुराव नेसरकर यांनी अहवाल सालात झालेल्या रु  ६८,०४,८९६.६२ पैसे  नफ्याची विभागणी सभेसमोर मांडून १५ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्याचे जाहीर केले. यावेळी वेळी अनेक सभासदांनी विविध विषयावर प्रश्न विचारुन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. या प्रसंगी संस्थेचे सभासद एम. एन. पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. रचनात्मक दृष्टीकोनातुन विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, दयानंद लांडे, अनंत सदावरे, सुरेश सुतार, हणमंत गाडीवड्डर तसेच सभासद नारायण राणबा पाटील, डॉ. मधुकर जाधव, नारायण कोकितकर, भरमाणा पाटील, तानाजी खांडेकर, संजयकुमार पाटील. वामन भोसले, तुकाराम मोरे, शिवाजी पाटील, कृष्णा जाधव, कृष्णा बेकमूरकर, नामदेव राघोजी, कृष्णा पाटील, भोमाणी कांबळे यासह सभासद, सेवक उपस्थित होते. आभार  कोवाड शाखाध्यक्ष दयानंद सलाम यांनी मानले. 

No comments:

Post a Comment