चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत अमृत कलश भरण उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
डॉ. पाटील म्हणाले, "चालविल्या गेलेल्या या अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देताना सांगितले की आजादीचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयाचा उर भरून येतो. मातीशी इमान राखून आम्ही हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे. देशाची एकता व अखंडता आबाद राखने आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे. समाजात पेरली जात असलेली वाईट विचारांची बीजे नष्ट करून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक दिलाने राहून अशा वर्णभेदी शक्तिंचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. घटनेचा आदर करून न्याय, समता, एकता, बंधूता टिकविने आपले आद्य कर्तव्य राहील. संपूर्ण मानव जातिचे कल्याण व आदर्श तत्वांचा अंगीकार प्रत्येक युवकाने करावा. या कलशभरण उपक्रमाचा हाच खरा उद्देश असल्याचे सांगितले."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वय डॉ. संजय पाटील यांनी केले. महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवकानी कलश भरण उपक्रमात सहभाग घेतला. सेल्फी/फोटो लिंकवर सोडण्यात आले. उपक्रम व्यवस्थितपणे पार पडला. डॉ. एन. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. व्हि. के. गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment