अवजड वाहनांवर अंकुश नसल्याने तिलारी घाटात पुन्हा चक्का जाम, वाहने अडकल्याने वाहतूक बंद, प्रवाशांचे हाल - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2023

अवजड वाहनांवर अंकुश नसल्याने तिलारी घाटात पुन्हा चक्का जाम, वाहने अडकल्याने वाहतूक बंद, प्रवाशांचे हाल

शनिवारी तिलारी घाटात अवजड वाहने अडकून पुन्हा एकदा तिलारी घाटात चक्का जाम वाहने अडकून पडली.

नंदकुमार ढेरे - चंदगड / प्रतिनिधी 

        गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव ला जवळचा मार्ग असलेल्या तिलारी धोकादायक घाटातून अवजड वाहने यांना बंदी असताना या वाहन धारकांवर चंदगड पोलिस यांचा अंकुश नसल्याने अवघड वाहने शाॅट कट मारण्यासाठी तिलारी घाट रस्ता याचा वापर करून इतर वाहने तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी बसेस यांना अडचणीत आणून प्रवाशांच्या गैरसोयीस कारणीभूत ठरत आहेत.दोन दिवसांपूर्वी दोन अवजड वाहने वळणावर अडकल्याने सात तास घाट बंद राहिला.ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुध वाहतूक करणारे मोठे वाहन एका अरूंद ठिकाणी बंद पडले आणि समोरून दुसरे वाहन बाजू घेताना साइडला अडकल्याने  तिलारी घाटात चक्का जाम झाले दोन्ही बाजूला असंख्य वाहने अडकल्याने प्रवासी वाहन धारक यांची गैरसोय झाली घाटात ना काही खायला ना कुठे पाय्यला पाणी अशी अवस्था झाली. चंदगड पोलिसांचा बांधकाम विभाग यांचा अवजड वाहतूक यावर अंकुश नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

    दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर असलेल्या तिलारी घाट रस्ता हा अवजड वाहने यासाठी बंद असताना या घाटातून अनेक अवजड वाहने चोर्लो घाट,मोलेम घाट, आंबोली घाट, येथून अंतर लांब आहे त्यामुळे जवळचा मार्ग चांगले रस्ते यासाठी तिलारी घाटाचा वापर करत आहेत.पण ही अवजड वाहने आता इतर वाहने यांना एक प्रकारे डोकेदुखी बनली आहे. या वाहनांमुळे गेले काही दिवस तिलारी घाट वाहतूकीला अडथळा ठरत आहे

याला कारणीभूत ठरत आहेत.अवजड वाहने.या घाटातून अवजड वाहने सोडू नका अशी मागणी करून देखील  या वाहनांना लगाम घालण्यासाठी चंदगड पोलिस दोडामार्ग पोलिस बांधकाम विभाग चंदगड कडून प्रयत्न होताना दिसत नाही.

       शनिवारी सकाळी तिलारी घाटातून दुध वाहतूक करणारे वाहन इतर वाहने अडकल्याने तिलारी घाटातील वाहतूक शनिवारी सकाळी दहा वाजता बंद झाली. ती दुपारी जवळपास तीन वाजेपर्यंत सुरू झाली नव्हती यामुळे  कोल्हापूर बेळगाव पणजी दोडामार्ग कडे जाणाऱ्या अनेक एस टी बसेस इतर चार चाकी खाजगी वाहने पर्यटक यांची चार चाकी वाहने  अडकून पडली.

   तिलारी घाटात मध्यवर्ती अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शनिवारी पुन्हा तिलारी घाट वाहतूक ठप्प झाली दूचाकी वाहन वगळता कुठलेही वाहन जावू शकत नव्हते अशी स्थिती होती.या अवजड वाहनांमुळे अनेक चार चाकी वाहने जी गोवा बेळगाव कोल्हापूर पुणे मुंबई तेलंगणा,या ठिकाणी जाणारी होती ती अडकून पडली.तिलारी घाटात कित्येक  तास वाहतूक बंद असताना यावर तोडगा काढण्यासाठी चंदगड पोलिस बांधकाम विभाग यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही . त्यामुळे चंदगड पोलिस बांधकाम विभाग  जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे अनेकांनी चंदगड पोलिस बांधकाम विभाग चंदगड यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 तिलारी घाट वाहने अडकल्याने दोडामार्ग येथून बेळगाव कोल्हापूर चंदगड, राधानगरी येथे जाणाऱ्या एस टी बसेस घाटात अडकून पडल्या तर दुसरीकडे कोल्हापूर ते पणजी,कागल पणजी,या बसेस अडकून पडल्याने यामुळे अनेक प्रवासी यांचे हाल झाले.घाटात पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर काही खायला दुकाने नाही त्यामुळे शनिवारी हा उपवास करण्याची वेळ आली.

 दोडामार्ग पणजी बेळगाव कोल्हापूर या ठिकाणी जाणारे अनेक प्रवासी हे वरील बसेस यांची प्रतिक्षा करत होते पण घाटात बसेस अडकल्याने प्रवासी यांची गैरसोय झाली दुपारचे चार वाजले तरी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चंदगड पोलिस दाखल झाले नाहीत चंदगड पोलिस बांधकाम विभाग यांनी आपली जबाबदारी टाळली यामुळे वाहन धारकांना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला या घाटातील गैरसोयीला कुणी वाली नाही असे काही जणांनी सांगितले बांधकाम विभाग चंदगड पोलिस यांना दिवसेंदिवस वाढत चाललेली अवघड वाहने बंद वाहतूक बंद होणे हे प्रकार रोखता येत नसतील तर तिलारी घाट सर्व वाहतूक करीता बंद करा जेणेकरून सहा ते सात आठ तास अशा प्रकारे अडकून पडण्याची वेळ प्रवासी वाहन धारकांवर येणार नाही असे काही प्रवाशांनी सांगितले.

     तिलारी घाट सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक बंद झाली दुपारचे चार वाजले तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणी फिरकले नाही अडकून पडलेल्या चार चाकी वाहन धारकांनी बाजूला दगड झाडी टाकून कशीबशी गाडी सुटेल अशी वाट केली.पण एस टी बसेस इतर वाहने ही घाटात परतण्यासाठी जागा नसल्याने अडकून पडली काही प्रवाशांनी नातेवाईक यांना फोन करून पर्यायी वाहन बोलावून काही अंतर चालत जाऊन पुढची सोय केली.

अवजड वाहनांमुळे एस टी बस यांना नुकसान सोसावे लागले.अवजड वाहने विरूद्ध चंदगड पोलिस बांधकाम विभाग यांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली असती तर आठवड्यात सलग तीन वेळा घाट बंद होण्याची स्थिती निर्माण झाली नसती . तेव्हा आता तरी जनतेची गैरसोय लक्षात घेऊन पोलिस बांधकाम प्रशासन यांनी कठोर पावले उचलली पाहिजेत शिवाय दोडामार्ग हद्दीतून विजघर चेकपोस्ट येथून अवजड वाहने सोडू नये यासाठी दोडामार्ग पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment