अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला....! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात; 'कोल्हापूर व हातकणंगले'त ७ मे रोजी मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2024

अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला....! देशात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात; 'कोल्हापूर व हातकणंगले'त ७ मे रोजी मतदान

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील सुमारे ९६ कोटी पेक्षा अधिक मतदार आतुरतेने वाट पाहत होते. ती 'लोकसभा निवडणूक- २०२४' अखेर आज दिनांक १६ मार्च २०२४ रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. देशात ही निवडणूक  विविध ७ टप्प्यात होणार आहे. तर महाराष्ट्रात ती ५ टप्प्यात होणार आहे पहिला टप्प्यातील मतदान १९ एप्रिल तर पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा आणि सर्व ४८ मतदारसंघ पुढील प्रमाणे-

◾️पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा २६ एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

No comments:

Post a Comment