कु. तेजस्विनी उदय भिंगुडे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील तेजस्विनी उदय भिंगुडे हिची तलाठी पदी तसेच पुन्हा कृषी सेवक पदासाठीही निवड झाली. एकाच महिण्यात दोन वेगवेगळ्या पदावर निवड झाल्यान कु. तेजस्विनीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
मागील महिन्यात परीक्षेच्या माध्यमातून
तेजस्विनीची तलाठी म्हणून सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये निवड झाली आहे. यानंतर कृषी सेवक पदाच्या परिक्षेमध्ये कोल्हापूर विभागात मूलीमध्ये प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण होण्याचा विक्रम तेजस्विनीने रचला. या दुहेरी यशाबद्दल तेजस्विनीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तीला वडील उदय व आई सौ निता यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment