चंदगड / प्रतिनिधी
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील मंगाईदेवी मंदिराचा नववा वर्धापनदिन कार्यक्रम रविवार १७ मार्च ते मंगळवार १९ मार्च अखेर ह . भ. प डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषात संपन्न होत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी प्रगतशील शेतकरी शिवाजी आवडणं यांच्या हस्ते मुहूर्तमेढ तर संध्याकाळी हभप.यल्लाप्पा पाटील यांचा (सांगाव) यांचे प्रवचन तर रात्री देवाची आळंदी येथील ओमकार महाराज दुडे यांचे किर्तन तर सोमवारी सकाळी बाळू गावडू पाटील यांच्या हस्ते अभिषेक व धार्मिक विधी तर सोमवारी सायंकाळी डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व रात्री यातिरज महाराज लोहोर (आळंदी) यांचे किर्तन व मंगळवारी सकाळी काला किर्तन , पालखी मिरवणूक, गंगा पूजन, महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment