म्हाळेवाडीचे निवृत्त वनअधिकारी आर. एस. पाटील यांना पत्नीशोक - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2024

म्हाळेवाडीचे निवृत्त वनअधिकारी आर. एस. पाटील यांना पत्नीशोक

 

शोभा राजाराम पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      मूळच्या म्हाळेवाडी (ता. चंदगड) व सध्या कोल्हापूर,  ताराबाई पार्क येथील रहिवासी शोभा राजाराम पाटील (वय 54) यांचे दीर्घकालीन आजाराने गुरुवारी (दि. 23) रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि. 23) सकाळी पंचगंगा नदी घाट, कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात  आई-वडील, सासरे, पती, दोन मुलगे, एक भाऊ, दीर असा परिवार आहे. त्या चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांच्या भाची होत. 

कृषी खात्याचे चंदगड कार्यालयातील निवृत्त कल्लाप्पा तारीहाळकर यांच्या त्या कन्या होत. 

 कागणी (ता. चंदगड) येथील भावेश्वरी सहकारी दूध डेअरीचे चेअरमन संजय तारीहाळकर यांच्या भगिनी तर इंजिनियर प्रणेय तारीहाळकर त्यांच्या त्या आत्या होत.

No comments:

Post a Comment