कुदनूर येथे संतोष मुतकेकर ह्या अपघातग्रस्त मित्राला आर्थिक मदत देताना त्यांचे वर्गमित्र. |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील संतोष मुतकेकर याचा एका अपघातात डावा पाय निकामी झाला. ही खबर श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री शाळेतील इयत्ता दहावी बॅच सन २००५-०६ च्या वर्गमित्रांना समजताच त्यांनी कुदनुर येथील मित्राच्या घरी धाव घेतली. गंभीर परिस्थितीत असलेल्या मित्राला आर्थिक मदत करण्याचे ठरवले. दरम्यान कालकुंद्री येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींनी एकत्र येत संतोष मुतकेकर याला देण्यासाठी 32567/- रूपये रक्कम जमा करून त्याच्या घरी जाऊन सुपूर्द केली.
आपापल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्याला मदतीचा हात देणाऱ्या वर्ग मित्रांचे आपण ऋणी आहोत अशी भावना यावेळी संतोष मुतकेकर यांनी व्यक्त केली. मदत प्रदान प्रसंगी संदीप कोले, विठोबा पाटील, जोतिबा सुतार, गिरीश तेऊरवाडकर, प्रशांत कोकीतकर, गजानन पाटील आदी वर्गमित्र उपस्थित होते. भविष्यात प्रत्येक वर्ग मित्राच्या सुखदुःखात सहभागी होऊन माणुसकी जपूया अशा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला. पाय गमावलेल्या मित्राचे नुकसान मोठे असले तरी मदतीला धावून जाणाऱ्या मित्रांची भावना कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment