कोकरे येथे अभिनव पद्धतीने केली घराची वास्तुशांती, काय आहे वेगळी पद्धत - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2024

कोकरे येथे अभिनव पद्धतीने केली घराची वास्तुशांती, काय आहे वेगळी पद्धत

 

कोकरे येथे पारंपारिक पद्धतीला फाटा देत वास्तू प्रवेश करताना मान्यवर

चंदगड / सी एल वृत्तसेवा

      कोकरे (ता. चंदगड) येथील ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी नवीन बांधलेल्या घराचा ग्रहप्रवेश समारंभ एका अभिभव आणि क्रांतिकारी व परिवर्तनवादी पद्धतीने केला आहे.                    सुभाष देसाई यांनी नवीन बांधलेल्या घराला संविधान नाव दिले असून या घराचा गृहप्रवेश हा परंपरागत विचारांना छेद देत तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबा साहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून व फित कापून गृहप्रवेश करण्यात आला .                       यावेळी प्रारंभी बौद्धाचार्य भिमराव मोहिते यांनी त्रिशरण व पचशील दिले. तसेच बौद्धाचार्य संजय कांबळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले . प्रा. दीपक कांबळे यांनी संविधानातील कलमांचे वाचन केले. यानंतर घराचे बांधकाम करणाऱ्या गवंडी, सेट्रिंग, पाया खुदाई, फरशी फिटींग, लाईट फिटींग, प्लंबर आदी कामगारांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवर व सर्व पाहुणे मंडळी यांनी कामगारांवर पुष्पवृष्टी केली. 



 यावेळी उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत संविधान उद्देशिका व गोविद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक देवून सुभाष देसाई, विठठल देसाई, सोनबा कांबळे, संतू कांबळे, सर्वेश देसाई, स्वपनील देसाई यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी नजीर आगा, प्रा. एच.के. गावडे, अरुण सय्यद, अशोक पेडणेकर, दयानंद कांबळे, प्रविण निगवेकर, चंद्रकांत कांबळे, संदिप मुंबईकर, दीपक कांबळे, माजी पोलीस निरीक्षक एस.के. कांबळे, विष्णू कांबळे, पंडीत कांबळे, वैजू कांबळे, राजू कांबळे, सुधाकर कांबळे, मनोज कांबळे, शामराव अडकूरकर याच्यासह नागरीक, पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रा. डॉ. दौलत कांबळे यांनी केले. तर आभार विठठल देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment