मुख्याध्यापक श्रीकांत सु. पाटील यांचा २५ मे रोजी कोवाड येथे सेवानिवृत्ती गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2024

मुख्याध्यापक श्रीकांत सु. पाटील यांचा २५ मे रोजी कोवाड येथे सेवानिवृत्ती गौरव

श्रीकांत सु. पाटील

कोवाड : सी एल वृत्तसेवा 
 मराठी विद्यामंदिर जक्कनहट्टी (ता. चंदगड) शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील (मुळगाव म्हाळेवाडी, ता. चंदगड) हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार मे २०२४ अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ शनिवार दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन तथा श्री मंगल कार्यालय कोवाड येथे संपन्न होत आहे. 


   डॉ. जे बी पाटील (मा. प्राचार्य कमला कॉलेज कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे सी एन मोहिते (निवृत्त शिक्षणाधिकारी माध्यमिक) यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार होणार आहे. यावेळी आमदार राजेश पाटील, बाळासाहेब भोगे (गटविकास अधिकारी चंदगड), सौ सुमन सुभेदार (गटशिक्षणाधिकारी चंदगड), शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे, केंद्र प्रमुख बी एस शिरगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जक्कनहट्टी तसेच सर्व शाळा मुख्याध्यापक केंद्र कोवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment