शेती सेवा केंद्राकडून शेती गटाला भात बियाणांचे मोफत वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2024

शेती सेवा केंद्राकडून शेती गटाला भात बियाणांचे मोफत वाटप



कोवाड : सी एल वृत्तसेवा

   किणी (ता. चंदगड) येथील श्री अष्टविनायक (आत्मा) शेतकरी गटाच्या सभासदांना राजश्री शेती सेवा केंद्र, कोवाड चे मालक विनायक रवींद्र देसाई यांनी नुकतेच मोफत बियाणांचे वाटप केले. यात भाताच्या अमन, शुभांगी, सारथी, इंद्रiयनी, रुद्रा, अमोघ आदी जातींचा समावेश आहे. याप्रसंगी शेतकरी गटप्रमुख संजय कुट्रे व शेती विभागचे तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक अभिजित दावने, कृषी पर्यवेक्षक सतीश कुंभार, कृषी सहाय्यक एस डी मुळे, अतुल मुळे व गोपाळ गव्हाळे आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप बिर्जे होते.


     यावेळी मारुती गवंडी, सुनील मनवाडकर, सुभाष बेळगावकर, नरसु मोटुरे, लक्ष्मण पाटील, सुबराव पाटील, पुंडलिक बिर्जे, पुंडलिक पाटील, रामू गवंडी, परशराम मणगुतकर, नारायण गवंडी, म्हातु कुट्रे, धोंडिबा हदगल, विष्णू गवंडी, संगीता मणगुतकर, श्रीमती अस्मिता तेऊरवाडकर, प्रभाकर सुतार, सुभाष मनवाडकर आदी शेतकरी उपस्थित होते. वसंत जोशीलकर यांनी प्रास्ताविकात गटाच्या कार्याचा आढावा घेतला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय कुट्रे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment