उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योग साधना- प्राचार्य एन. डी. देवळे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2024

उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योग साधना- प्राचार्य एन. डी. देवळे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन

 

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये  २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या २१ जून या भौगोलिक दिनाचे व आपल्या  जीवनातील योगाचे महत्त्व सांगीतले . क्रीडा शिक्षक टी.व्ही खंदाळे यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखवून मुलांच्याकडून शास्त्रीय पद्धतीने योगा करवून घेतले.

     यावेळी ग्रंथपाल शरद हदगल यांनी तयार केलेल्या 'योगमंत्रा 'या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मुख्याध्यापक एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

         कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, व्ही. के. गावडे, टी. टी. बेरडे, व्ही. एम. मोहणगेकर, जे. जी. पाटील, डी. जी. पाटील, व्ही. टी. पाटील, टी. एस. खंदाळे, एस. जे. शिंदे, पुष्पा सुतार, व्ही. के. पाटील, व्ही. एम. डोंगरे, ओंकार पाटील, आर. एस. कांबळे, ग्रंथपाल शरद हदगल, कुंदन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार बी. आर. चिगरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment