निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती - योगा मार्गदर्शक संजय काणेकर यांचे प्रतिपादन, फादर अग्नेल स्कूलमध्ये जागतिक योगा दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2024

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती - योगा मार्गदर्शक संजय काणेकर यांचे प्रतिपादन, फादर अग्नेल स्कूलमध्ये जागतिक योगा दिन साजरा

 

फादर अग्नेल स्कूलमध्ये जागतिक योगा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना संजय काणेकर, समोर विद्यार्थी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       आरोग्य हीच आपली खरी धनसंपत्ती असून आपण आपले आरोग्य नेटके ठेवले पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्याकरिता नियमित आपण  योगासने केली पाहिजेत. असे प्रतिपादन गोसंवर्धक व आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान असलेले योगा मार्गदर्शक संजय काणेकर यांनी प्रतिपादन केले. ते फादर अग्नेल  स्कूल मध्ये जागतिक योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे धडे देताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल  होते. 

      काणेकर पुढे म्हणाले, ``संपत्ती पेक्षा हे आरोग्याला महत्त्व दिले जाते. चायनीज फास्ट फूड व कमी झालेल्या श्रमामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी आजारपण उद्भवत आहेत. अशावेळी वैद्यकीय उपचार घेऊन आर्थिक नुकसान होत आहे. याकरिता सर्वांनी योगासन हा उत्तम पर्याय स्वीकारला पाहिजे. व आपले आरोग्य आपण आबादीत ठेवले पाहिजे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना ताडासन, शिर्षासन, वृक्षासन, मयूरासन, शवासन, ओमजप,अनुलोम विलोम, सूर्यनमस्कार असे अनेक योगासनाचे प्रकार करून दाखवले व त्याचे महत्त्वही सांगितले.`` अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी ही विद्यार्थ्यांनी ग्रहण क्षमता वाढवण्याकरिता  नियमित योगा करण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. यावेळी फादर रिगन, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण यांच्यासह  शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment