चंदगड मधील शाळा महाविद्यालयांत योग दिनाचा उत्साह - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2024

चंदगड मधील शाळा महाविद्यालयांत योग दिनाचा उत्साह

 

केंद्रीय शाळा कालकुंद्री येथे विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त प्रात्यक्षिकांची मार्फत माहिती देताना शिक्षक व शिक्षिका.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    आज २१ जून २०२४ जागतिक योग दिन. या निमित्ताने चंदगड तालुक्यातील सर्व शाळा, विद्यालय व महाविद्यालयांत योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांकडून योग्य प्रात्यक्षिके करून घेण्याबरोबरच नियमित योगसाधना केल्याने होणारे फायदे सांगण्यात आले.

     जागतिक स्तरावर नऊ वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१५ मध्ये २१ जून रोजी जागतिक योग दिन सुरू करण्यात आला. पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस हा २१ जून रोजी असतो त्यामुळे योग दिनासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. जगातील १७७ देशांनी पहिल्या वर्षापासूनच आपापल्या देशात योग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. हजारो वर्षांपूर्वीपासून भारत देशातील तत्कालीन ऋषीमुनींच्या जीवनशैलीचा भाग असलेल्या योगसाधनेला या दिनामुळे जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. यात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत याबद्दलचा प्रस्ताव मांडला होता. त्याला ११ डिसेंबर २०१४ मंजुरी नंतर यश आले. जगातील लाखो लोक सामूहिक रित्या या दिवशी योग साधना करतात.

    चंदगड तालुक्यातही योग दिनानिमित्त विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते. शासकीय पातळीवर सुद्धा योग दिन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न अधिकाधिक प्रयत्न होताना दिसत असून योग दिनानिमित्त आज शुक्रवार असूनही शाळा दिवसभर ऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्यात आली होती. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी तर काही ठिकाणी योग तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाचे धडे देण्यात आले. सकाळपासूनच तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये योग्य दिनाचे चैतन्य दिसून आले.

No comments:

Post a Comment