चंदगड बसस्थानक |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील आगारामध्ये शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत प्रवासी राजा दिनाचे आयोजन केले आहे. अशी माहिती आगाप्रमुक अश्विनी जगदाळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
या प्रवासी दिनाला कोल्हापूरचे विभाग नियंत्रक उपस्थित राहणार आहेत. प्रवासी राजा दिनामध्ये प्रवासी, प्रवासी संघटना व सर्व तक्रारदार यांच्या राज्य परिवहन महामंडळाशी निगडीत तक्रारी लेखी निवेदनाद्वारे स्वीकारून त्यासंबंधी तात्काळ निर्णय देण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रवासी संघटना व सर्व रा.प महामंडळाच्या निगडीत तक्रारदार यांनी प्रवासी राजा दिनादिवशी उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment