चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील आसगाव येथील ताम्रपर्णी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ वैजू नाईक यांची कन्या ऋतुजा नाईक हिने 8 वी NMMS आणि 8 वी शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षेत धवल यश मिळवले. गेल्या 10-12 वर्षांपूर्वी जी शिष्यवृत्तीची परंपरा या गावात होती. त्याची सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून दिली. तीने MNNS परीक्षेत 200 पैकी 138 गुण मिळवून संजय गांधी विद्यालय नागणवाडी शाळेत 3 री आली आणि शिष्यवृत्ती परीक्षेत 300/212 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक ठरली.
यानिमीत्त आसगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती आसगावच्या वतीने तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सागर गावडे, उपाध्यक्ष कृष्णा गावडे, सदस्य रमेश कांबळे, प्रल्हाद गावडे, वसंत गावडे, मारुती हाळवणकर उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील जागृत आणि क्रियाशील कमिटी असून मागील वर्षात 3 लाख जमा करून शाळा रंगरंगोटी, सुशोभीकरण केले. कोणी विद्यार्थ्याने असे यश मिळवले की त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करून प्रोत्साहन देत असते. यावेळी चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक व क्रियाशील शिक्षक विश्वनाथ गावडे यांच्या कुटुंबीयांनी कुमारी ऋतुजा नाईक हिच्या यशाचे कौतुक करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला.
No comments:
Post a Comment