चंदगड तहसीलदारांच्याकडून तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2024

चंदगड तहसीलदारांच्याकडून तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी

 

रामपूर तालुका चंदगड केंद्र क्रमांक 308 व 309 ला तहसीलदार राजेश चव्हाण यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. यावेळी उपस्थित कर्मचारी वर्ग

चंदगड / प्रतिनिधी

     आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील मतदान केंद्रांना चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण हे भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी करत आहेत. अद्यावत सुस्थितीत मतदान केंद्र आहेत का हे पाहण्यासाठी आज आणि उद्या दोन दिवसाचा दौरा आयोजित केला आहे.

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील असणारे २०० मतदान केंद्र मतदानासाठी अद्यावत सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी चंदगड तालुका दौरा सुरू केला असून त्यांनी आज माणगाव विभागातील मतदान केंद्रांना भेटीतून मतदान केंद्र खोली सुस्थितीत आहे का? खोलीमध्ये विद्युत पुरवठा, अपंगांसाठी मतदारांना रॅप, मतदाराना रांगेत थांबताना उन्हापासून सुरक्षितता आहे का? शिवाय येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, संडास बाथरूमची व्यवस्था आदींची पाहणी करून मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खातjजमा करून घेत आहेत.

       चंदगड सारख्या दुर्गम भागात वाड्यावरच्या वरती काही केंद्रामध्ये अध्यापही काही सुविधा पोहोचल्या नसल्याने त्या तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा सुरू असून आगामी विधानसभा निवडणूक पूर्वी सर्व मतदान केंद्र सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न चंदगड तहसील कार्यालयाकडून होत आहे. या केंद्र तपासणी पथकामध्ये खुद्द तहसीलदार, नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी यांच्यासोबत त्या विभागातील तलाठी, पोलीस पाटील आणि संबंधित केंद्रावरती काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही पाहणी सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment