एकाच दिवशी कालकुंद्रीचे दोघे जण 'सी ए' परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2024

एकाच दिवशी कालकुंद्रीचे दोघे जण 'सी ए' परीक्षा उत्तीर्ण


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    अधिकाऱ्यांचा गाव म्हणून चंदगड तालुक्यात अग्रेसर असलेल्या कालकुंद्री गावातील दोघे तरुण आज एकाच दिवशी 'चार्टर्ड अकाउंट' (सीए) परीक्षा पास झाले. यामुळे गावच्या लौकीकात आणखी भर पडली आहे. 
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'सी ए' परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विक्रम पाटील त्याचे वडील तुकाराम व आई रेणुका पाटील यांचा सत्कार करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील. यावेळी उपस्थित विनोद पाटील आदींसह विक्रम चे कुटुंबीय
      विक्रम तुकाराम पाटील व स्वप्निल वसंत पाटील या दोघांनी आज दि. ११/०७/२०२४ रोजी एकाच वेळी सीए पदाला गवसणी घालत गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे. गावात यापूर्वी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, शैक्षणिक व वैद्यकीय आदी अनेक क्षेत्रात अधिकारी असले तरी सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले हे पहिलेच दोघे आहेत. त्यामुळे यांचे वेगळेपण लक्षात येते.
    विक्रम पाटील यांचे वडील तुकाराम कृष्णा पाटील हे शेतकरी असून ऊस तोडणी टोळी मुकादम म्हणून परिचित आहेत ते चौथी पास असून त्याची आई रेणुका ही अल्पशिक्षित शेतकरी असतानाही त्यांच्या मुलग्याने सीए पदाला घातलेली गवसणी कौतुकास्पद आहे. तर स्वप्निल याचे वडील वसंत पांडुरंग पाटील हे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची अभ्यासातील चिकाटी व जिद्द गाव व तालुक्यातील तरुणांना दिशादर्शक ठरणारी आहे. विक्रमच्या यशाबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून गावात मिरवणूक काढण्यात आली.

No comments:

Post a Comment