चंदगड : सी एल वृतसेवा
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश बोकडे तर उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे यांची निवड झाली. नूतन सदस्यांमध्ये नितीन पोवार, भरमाजी तुपारे, जयवंत हारकारे, उत्तम तुपारे, अंजली सुतार व सुनिता पाटील यांचा समावेश आहे. शिक्षणतज्ञ म्हणून निंगाप्पा बोकडे यांची पुन्हा निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जोतीबा पाटील, संगिता जळगेकर, सुजाता कांबळे, नेहा पाटील, जयश्री हारकारे, अजित पाटील, संजय साबळे, रुपेश मऱ्यापगोळ, मनिषा पाटील, वर्षा वेसणे, तनुजा पोपकर यासह पालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment