संत गजानन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2024

संत गजानन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

अनुजा जाधव

श्रेया खबाले

बालाजी चौगुले

संकेत मुत्नाळे

महागाव / सी एल वृतसेवा

     महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहाअंतर्गत संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  चार विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली. श्रेया खबाले, अनुजा जाधव व संकेत मुत्नाळे यांची टाटा कॅन्सलटन्सी सर्विसेस तर बालाजी चौगुले या विद्यार्थ्यांची प्रोव्हेंटेक इंडिया प्राव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली.
     या दोन्ही कंपनीसाठी ऑनलाईन मुलाखत प्रकिया हि गेल्या महिनाभरापासून सुरु होती. कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली. सांगली व कोल्हापूर, जिल्ह्यातील इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता. पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या कार्यालयात झालेल्या अंतिम मुलाखतीतून श्रेया खबाले, अनुजा जाधव व संकेत मुत्नाळे यांची निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना सर्वाधिक ४.२९ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. तर प्रोव्हेंटेक इंडिया प्राव्हेट लिमिटेडसाठी बालाजी चौगुले यांची निवड झाली. त्यांना वार्षिक चार लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
    विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष अँड. डॉ. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, संस्थासचिय अँड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचारी यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्राचार्य डॉ. संजय सावंत, प्लेसमेंट विभागप्रमुख संतोष गुरव, प्रा.सिदौडा जबडे, अ अकॅडमीक कोऑरडीनेटर प्रा. सचिन माटले, विभागप्रमुख प्रा. अमरसिंह फराक्टे, प्रा. शिवलिंग स्वामी, विभाग प्रतिनिधी प्रा.डी.एस.पाटील, प्रा. अचला नारायणकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment