चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड, लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2024

चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

श्रीम. निवंता पांडुरंग चौगुले रा पोवाचीवाडी अंदाजे नुकसान 150000 झाले आहे राहते घर पूर्ण पडले आहे

चंदगड : सी एल वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसात सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा फटका अधिक प्रमाणात बसला आहे. 

नागवे येथील गुरुनाथ शिवाजी गुरव यांच्या राहत्या घराची  पाठीमागील भिंत पावसामुळे कोसळली. अंदाजे 15000/- चे नुकसान.

   घरांची पडझड झालेल्यांमध्ये मौजे हाजगोळी येथील चाळोबा गावडू गावडा यांच्या राहत्या घराची भिंत पडुन अंदाजे ३० हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. 

ढेकोली येथील युवराज शिवाजी पाटील यांच्या राहत्या घराची भिंत पडून अंदाजे 60000/ - रूपये नुकसान झाले आहे.

   ढेकोळी येथील युवराज शिवाजी पाटील यांच्या राहत्या घराची भिंत पडून अंदाजे ६० हजार रूपये नुकसान झाले आहे. नागवे येथील गुरुनाथ शिवाजी गुरव यांच्या राहत्या घराची पाठीमागील भिंत कोसळली. यात त्यांचे अंदाजे रुपये १५ हजार इतके नुकसान झाले. 

मौजे हाजगोळी येथील श्री चाळोबा गावडू गावडा यांच्या राहत्या घराची भिंत पडुन अंदाजे नुकसान र रु 30000 इतके झाले आहे .

     पोवाचीवाडी येथील श्रीमती निवंता पांडुरंग चौगुले, वय ४९ यांचे राहते घर पूर्णपणे कोसळून किमान दीड लाख पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. आधी आपद्ग्रस्तांचा समावेश आहे

     वरील पडझडीच्या घटनांचे पंचनामे संबंधित तलाठी व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून बाधित नागरिकांनी शासनाकडून योग्य भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment