गुरुपौर्णिमेनिमित्त सरपंचांच्या मानधनातून म्हाळेवाडीत वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2024

गुरुपौर्णिमेनिमित्त सरपंचांच्या मानधनातून म्हाळेवाडीत वृक्षारोपण

म्हाळेवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करताना आम्ही म्हाळेवाडी कर ग्रुपचे सदस्य
चंदगड : सी एल वृत्तसेवा
     गावचे सौंदर्य वाढावे व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडावी या उद्देशाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपताना गावचे सरपंच सी. ए. पाटील यांनी आपल्या मानधनातून दिलेल्या सुपारीच्या रोपांचे मुख्य रस्ता, प्राथमिक शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी 'आम्ही म्हाळेवाडीकर' गृपचे सहकार्य लाभले. 
  सकाळी गावात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच सी ए पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, गुरुवर्य एन आर पाटील, रघूनाथ पाटील, डी एल पाटील, तंटामुक्त उपाध्यक्ष अरुण मर्णहोळकर, पोलीस पाटील जगदीश पाटील, निंगाप्पा दळवी, प्रशांत कांबळे, माजी सैनिक प्रकाश पाटील, बी आर पाटील, डी बी पाटील, सचिन पाटील, विलास पाटील , रमेश पाटील, ज्ञानेश्वर कोकीतकर, अभिजीत कांबळे, एकनाथ कांबळे, विठोबा पाटील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. रोपे उपलब्ध करून देण्यासाठी अनिल दळवी व उमेश पवार यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment