वाचनाने आयुष्य घडते - प्रा. पी. डी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2024

वाचनाने आयुष्य घडते - प्रा. पी. डी. पाटील


चंदगड / प्रतिनिधी 

    दैनंदिन जीवनात जगण्याचे महत्त्व समजून घ्या. वाचन ही आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. ज्ञान संपन्नतेकडे जाताना ज्ञानाचा आणि व्यवहाराचा उपयोग करा. माणूस म्हणून जगणं आज कठीण आहे. अशावेळी प्रयत्नवादी, विज्ञानवादी आणि पर्यावरणवादी बना. गरजेपुरती संपत्तीमिळवा. वचन, तत्व, सिद्धांत पाळणे म्हणजे माणूस होय. यासाठीच गांधी विचार समजून घ्या. ज्ञानाने परिपूर्ण व्हा."असे विचार प्रा. पी. डी. पाटील यांनी मांडले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित नवागतांच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते. प्रारंभी वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी केले. महाविद्यालयाची भूमिका प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी मांडली. यावेळी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्राचार्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात गोपाळराव पाटील म्हणाले, "अभ्यासातील सातत्य ही यशाची वाटचाल असते. कठोर परिश्रमाशिवाय माणूस म्हणून आपण घडणार नाही. यासाठी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. ए. बोभाटे यांनी केले. आभार प्रा. यु. एस. पाटील यांनी मानले. यावेळी नवागत विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment