हत्तरगी येथेे श्री हरी काका गोसावी भागवत मठात गोकुळ अष्टमी निमित्त 26 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2024

हत्तरगी येथेे श्री हरी काका गोसावी भागवत मठात गोकुळ अष्टमी निमित्त 26 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
       हत्तरगी  येथील  श्री हरी काका गोसावी भागवत  मठात गोकुळ  अष्टमी निमित्त दिनांक 26 ऑगस्ट   रोजी  आंतरराज्य  भजन  सम्राट  स्पर्धा सकाळी 11 वाजता
आयोजित करण्यात आल्या आहेत. या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत भजनी मंडळ संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंह  एकनाथ  गोसावी महाराज  यांनी केले आहे. 
दिनांक 26 ऑगस्ट   रोजी  रात्री दहा वाजता सौ. स्वरदा पटवर्धन हरिदास (सांगली) यांचे श्रीकृष्ण जन्म सोहळा, नारदीय किर्तन होणार आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी पारणे, प्रवचन व भजन यासह सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायिका श्रुती मराठे -विष्वकर्मा यांची भक्ती संगीत गायन सेवा यासह विविध सांगितीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. माण (तालुका शाहूवाडी) इथून आनंद दिंडी हत्तरगी येथे येणार आहे व दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे.
हत्तरगी येथील पुरातन श्री हरीकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी तीन दिवस गोकुळ अष्टमी उत्सव निमित्ताने  विविध  कार्यक्रम  आयोजित  करण्यात आले आहेत- दिनांक 26 ऑगस्ट रोजी आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 11,001 /- रुपये रोख बक्षीस व मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना प्रशस्तिपत्र  देऊन गौरविण्यात येणार आहे.  
आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणास 18 मिनिटे वेळ असेल. या वेळेत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करावी लागेल. या रचना संत रचितच म्हणजे गाथ्यामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी व कानडी भाषेत असावेत. इच्छुक संघांनी दिनांक  20 ऑगस्ट पर्यंत आपली नावे श्री हरी मंदिर हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे नोंदवावीत.  द्वितीय क्रमांकास रुपये 7001 /- रोख व मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये 5001/- रोख व मानचिन्ह, उत्तेजनार्थ रुपये 3001/- रोख व मानचिन्ह तसेच उत्कृष्ट वादक व गायक यांना प्रत्येकी 1001/- रोख व मानचिन्ह देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment