कार्वे शाळेने सैनिकांसाठी बनवलेल्या राख्या सुभेदार मेजर नेसरकर यांनी स्विकारल्या - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2024

कार्वे शाळेने सैनिकांसाठी बनवलेल्या राख्या सुभेदार मेजर नेसरकर यांनी स्विकारल्या

कार्वे शाळेच्या वतीने सुभेदार मेजर दयानंद नेसरकर यांना कोल्हापूर मुख्यालयात राख्या सुपूर्द करताना शिवाजी पाटील व शिक्षक संघाचे पदाधिकारी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
     एक राखी सैनिकासाठी उपक्रमांतर्गत मराठी विद्या मंदीर मौजे कार्वे, ता चंदगड शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चाळुचे यांचे मित्र व मराठा लाईफ इन्फंट्री बटालियन कोल्हापूर येथे सध्या कार्यरत असणारे दड्डी गावचे सुपुत्र सुभेदार मेजर दयानंद नेसरकर यांच्याकडे या राख्या शाळेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केल्या. बटालियनच्या वतीने त्यांनी सन्मानपूर्वक राख्या स्वीकारल्या. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे सुभेदार मेजर नेसरकर यांनी आभार व्यक्त केले.
 राख्या तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतान लोबो, शिक्षिका सीमा नांदवडेकर, नंदा नाईक, शिक्षक आनंदा कांबळे, शिवाजी पाटील, शिवाजी यळूरकर, सट्टूपा लोहार  यांनी मार्गदर्शन केले. राख्या सुपूर्द करताना प्राथमिक शिक्षक संघ परिवार चंदगडचे अध्यक्ष शिवाजी पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment