केडीसीसी चे निवृत्त शाखाधिकारी शिवाजी कोकितकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2024

केडीसीसी चे निवृत्त शाखाधिकारी शिवाजी कोकितकर यांना मातृशोक

कै. सौ. लक्ष्मीबाई कोकितकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी सौ लक्ष्मीबाई आप्पाजी कोकितकर, वय ८० यांचे आज गुरुवार दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी कालकुंद्री स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात विवाहित तीन चिरंजीव, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.  
   केडीसीसी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी शिवाजीराव कोकितकर तसेच कोवाड येथील रमाकांत सेल्स कार्पोरेशनचे मालक रमाकांत कोकितकर यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवार दि. ०५/०८/२०२४ रोजी आहे.

No comments:

Post a Comment