चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड ) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा. आर. बी. गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील,अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, प्राचार्य डॉ बी डी अजळकर, माजी प्र. प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, माजी उपप्राचार्य प्रा. एच के गावडे, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गावडे हे ३० वर्षापासून हिंदी व शिक्षणशास्त्र या विषयाचे अध्यापन करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच समस्यांचा त्यांना अभ्यास असून अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. अध्ययन अध्यापना बरोबरच ते सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. सध्या ते कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे उपाध्यक्ष असुन राष्ट्रीय कॉग्रेस चंदगड तालुका शिक्षक सेल चे अध्यक्ष म्हणून ही कार्यरत आहेत.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय सन १९८९ पासून चंदगड तालुक्यातील एक अग्रगण्य महाविदयालय असून प्रा. गावडे या महाविदयालयात अध्यापनाबरोबरच अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात. त्यांचे अध्यापनातील कौशल्य व शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेवून संस्थेने त्यांना उपप्राचार्य पदी बढती दिली आहे. यावेळी प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एस एन पाटील यांनी केले तर आभार स्टाफ सक्रेटरी डॉ चंद्रकांत पोतदार यांनी मानले. यावेळी महाविधालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकिय विभाग शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
No comments:
Post a Comment