नमिता मोटार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाकडील कु. पूजा गणपती पाटील हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक तर कु. नमिता नारायण मोटार हिने चौथा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थिनीनी शिवाजी विद्यापीठाच्या एम.एससी प्रवेश परीक्षेतहीं धवल यश प्राप्त केले आहे. विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत कु. पूजा पाटील हिने तृतीय तर कु. नमिता मोटार हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशस्वी विद्यार्थिनींना संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एल.एन. गायकवाड, प्रियंका निटूरकर, प्रा मनाली हांडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी.गोरल यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment