नामदेव दळवी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तिलारीनगर (ता. चंदगड) येथील दत्तमाऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित तिलारीनगर या संस्थेची सन २०२४ ते २९ साठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ च्या नियम ३७ मधील तरतुदींना अनुसरून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस व्ही सावंत उपस्थित होते.
निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे चेअरमन- टोपा खाचू दळवी (कळसगादे), व्हा चेअरमन नामदेव बाबू दळवी (गुळंब), सर्वसाधारण प्रतिनिधी सदस्य संदीप तुकाराम गवस (कळसगादे), विनोद पिराजी घोडके (तिलारीनगर), वैजू डामाना गावडे (पार्ले), मधुकर रामचंद्र गावडे (कोदाळी), रंजना शिवाजी चौगुले (कोदाळी), वामन शिवाजी गावडे (कोदाळी), महिला प्रतिनिधी- आरती विठोबा दळवी (गुळंब), अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी- प्रकाश लक्ष्मण कांबळे (कोदाळी), भटक्या, विमुक्त जाती- जमाती प्रतिनिधी- पिंटू धोंडीबा डोईफोडे (बांदराईवाडा), इतर मागास प्रतिनिधी- अंकुश सटू गोंडे (गुळंब) या सदस्यांची निवड घोषित करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यांनी पतसंस्थेचा कारभार नियमानुसार योग्य पद्धतीने चालवावा अशा सूचना व शुभेच्छा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंध सहकारी संस्था यांच्याकडून देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment