मैत्री ही निखळ असली पाहिजे - डॉ. पी एल भादवणकर, माडखोलकर महाविद्यालयात मैत्री दिन व मोडी लिपी दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2024

मैत्री ही निखळ असली पाहिजे - डॉ. पी एल भादवणकर, माडखोलकर महाविद्यालयात मैत्री दिन व मोडी लिपी दिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      मैत्री ही निखळ असली पाहिजेत, विश्वास हा मैत्रीचा पाया आहे,समाज निकोप वातावरण ठेवून समाज एकसंघ करायचा असेल तर जातपात विसरून मैत्रीची वीण घट्ट करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. पी एल भादवणकर यांनी व्यक्त केले.

        ते चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात कला शाखेच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या मैत्री दिन व मोडी लिपी दिन या संयुक्त  कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

      डॉ. भादवणकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, सध्याच्या व्हाट्सअप युगामध्ये विद्यार्थ्यांनी वरवरची दिखाऊ मैत्री करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीमध्ये मैत्रीची जी संकल्पना सांगितलेली आहे ती  समजून घेऊन  सृजनशील नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

     याप्रसंगी बोलताना मोडी लिपी तज्ञ प्रा. डॉ. बाबली गावडे म्हणाले की, इतिहास तज्ञ वासुदेव शास्त्री खरे यांचा जन्मदिवस मोडी लिपी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, आजच्या युगामध्ये नामशेष होत चाललेल्या मोडी लिपीचे  ज्ञान घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आपल्या चरितार्थाचा प्रश्न सोडवावा. तसेच ऐतिहासिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून मोडी लिपीचे ज्ञान हे महत्त्वाचे असल्याचे मत ही  त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

     अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना प्र. प्राचार्य डॉ. गोरल म्हणाले की, मैत्री ही दूध आणि पाण्यासारखी  असावी.. तसेच आजच्या विज्ञान युगात मित्रत्वाचे नाते टिकवणे आणि त्याची जपणूक करणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

    प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.ए.डी  कांबळे यांनी केले. आभार हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस.एन. पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमाला प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. शाहू गावडे,  डॉ.जी वाय कांबळे. प्रा.सौ.एस. बी. दिवेकर, एस.व्ही. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment