चंदगड (प्रतिनिधी) :
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सतत काम करत राहणार असून शेतकरी, वाहतूकदार आणि कामगारांच्या पाठबळावरचं दौलतला समृद्ध करण्यास सक्षम झालो. त्यामुळे हेच आपले केंद्रबिंदू असल्याचे मत मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. दौलत कारखाना स्थळावर तोडणी वाहतूकदार यांचा निर्धार मेळावा मंगळवारी घेण्यात आला. त्यावेळी विधानसभेला पाठबळ देण्यासाठी जिवाचं रान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, वाहतूक संघटनेतील रमेश दत्तू पाटील, शंकर देवाप्पा गावडे, रामा वांद्रे, अनिल धनाजी गावडे, रमेश पाटील, मधुकर करडे, संजय सुरुतकर आणि सर्व तोडणी वाहतूकदार उपस्थित होते.
मानसिंग खोराटे म्हणाले, ``स्वतः गरीबीतून आल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. त्यांच्या मेहनतीच्या मूल्याची जाण असून कष्टातून नेहमीच मला प्रेरणा आणि उर्जा मिळते. त्याचप्रमाणें आपल्या चंदगड विधानसभामध्ये आपण बहुतांश शेतकरी वर्गात येतो आणि काबाड कष्ट करतो. परंतु कष्टातून शिकवलेल्या मुलांना रोजगार ऊपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी देऊन समृध्द करण्याचं माझं स्वप्न आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि त्यांच्याशी संबंधित कुटुंबांचे जीवनमान सुधारू शकेल. त्यासाठी चंदगड मतदारसंघातील हलकर्णी तसेच शेंद्री येथील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने कामही सुरू आहे. त्यासाठी जनतेने विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहावे असे आवाहन खोराटे यांनी केले.
मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी वाहतूकदार, कामगार, शेतकरी यांनी गावागावात काम सुरू केले आहे. त्यामुळे मतदारसंघातून खोराटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया असा निर्धार वाहतूकदार संघटना आणि संबंधित कामगार यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment