हेमरस (ओलम) साखर कारखान्याचा गुरुवारी १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2024

हेमरस (ओलम) साखर कारखान्याचा गुरुवारी १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       राजगोळी खुर्द - चंनेहट्टी  (ता. चंदगड) येथील ओलम ग्लोबल अग्री कमोडीटीज इंडिया प्रा.लिमिटेड या साखर कारखन्याचा १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम गुरुवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली आहे. तरी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापन यांचेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment