देवरवाडी येथे दिपावली किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2024

देवरवाडी येथे दिपावली किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       देवरवाडी (ता. चंदगड) येथील प्रज्ञावंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्पर्धेत गावातील १७ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण उपसरपंच गोविंद आडाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. स्वागत मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश नाग यांनी केले. स्पर्धेतील विजेते अनुक्रमे अथर्व संदीप भोगण (प्रतापगड किल्ला), गणपत गल्ली बॉईज (सिंधुदुर्ग किल्ला), साईराज जाधव (राजहंसगड किल्ला), सोहम कांबळे (अजिंक्यतारा किल्ला) या प्रतिकृतींना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, शंकर भोगण, व्ही एल कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ कांबळे यांनी केले. सचिन कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment