चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होणार हे निश्चितच आहे. ती खिलाडू वृत्तीने राजकारण म्हणून लढवली जावी अशी इच्छा आहे. मात्र, तसं न होता कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार शिनोळी येथे घडला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांचा फ्लेक्स फाडण्याचे कृत्य अज्ञाताकडून करण्यात आले आहे. राजकारणातून शाश्वत विकासाचं समाजकारण करण्याचं धोरणं घेऊन सामान्य जनतेत अल्पावधीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय उमेदवार मानसिंग खोराटे यांचा विरोधकांनी धसका घेतल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळेच नियमानुसार परवानगी घेवून प्रसिध्दीसाठी लावण्यात आलेला फ्लेक्स फाडण्याचा बालिशपणा करण्यात आला आहे. हा केविलवाणा प्रयत्न असून चंदगडची सुज्ञ जनताच याला योग्य उत्तर देईल असा हल्लाबोल मानसिंग खोराटे यांनी प्रतिक्रिया देताना केला. तसच याबाबत निवडणूक आयोग तथा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.
- चंदगडची स्वाभिमानी जनताच योग्य उत्तर देईल
लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यातही लोकांच्या हितासाठी, सामन्यांच्या हक्कासाठी आपण या निवडणुक रणांगणात उतरलो आहे. कुणालाही पाडण्यासाठी किंवा कुणाच्या विरोधात ही लढाई नाही. माझे शेतकरी, कामगार, चंदगड मतदारसंघातील माता, भगिनी, तरुण - तरुणी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी माझा लढा आहे. आजपर्यंत इथल्या राजकारण्यांनी लोकांचा विचार कधी केलाच नाही. आज त्यांच्या बाजूने उभे राहणारा उमेदवार भेटल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच सरळ सरळ विरोध करता येत नसल्याने असेल शुल्लक उद्योग त्यांच्याकडून सुरू आहेत. पण, त्याला इथली स्वाभिमानी जनताच योग्य उत्तर देतील अशी भावना मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली.
- जनताच माझी पाठीराखी
काहीही झाले, कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तरी मी मागे हटणार नाही. जितका तुम्ही विरोध कराल, तितक्या त्वेषाने लोकांच्या बळावर मी पुढे येईन. तुम्ही सर्वसामान्य जनतेला इथून पुढे फसवू शकणार नाही. ही जनताच माझी पाठीराखी असून बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना त्यांनी आता खरी करायचं ठरवलं आहे. त्यांच्याच जीवावर मी नक्की या विधानसभेतून निवडून येईल असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment