तिलारी घाटात कोंबड्या वाहतूक करणारा टेंपो पलटी, चालक जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2024

तिलारी घाटात कोंबड्या वाहतूक करणारा टेंपो पलटी, चालक जखमी



दोडामार्ग : सी. एल. प्रतिनिधी
    तिलारी घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू आहे. येथून जाणाऱ्या एका वाहनातील इंजिन ऑईल घाटातील एका धोकादायक चढ उतार वळणावर पडले होते. या ऑइल वरून स्लीप होऊन आज गुरुवारी दुपारी कोंबड्या वाहतूक करणारा टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. तर दुचाकी सारखी अनेक वाहने घसरून चालक किरकोळ जखमी झाले. चार चाकी कार देखील घसरल्याने वाहनधारकांची एकच भंबेरी उडाली. 
   अपघातात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या गाडीचा चालक जखमी झाला तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील सामाजिक युवा कार्यकर्ते दत्ताराम देसाई इतर ग्रामस्थ प्रवाशांनी पडलेल्या ऑइल वर माती टाकून वाहने घसरु नये यासाठी प्रयत्न केले. या अपघाता मुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. काही वेळानंतर गाडी बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली.

No comments:

Post a Comment