तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
गणेशवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी शिवगोंडा अप्पाना पाटील (वय ६७ वर्षे) याना राजगोळी गावच्या हद्दीत कल्लापा निंगापा पाटील यांच्या मालकीच्या शेतात जनावारे चारवताना तुटून पडलेल्या विद्यूत तारेच्या विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. याबरोबरच त्यांच्या सोबत असणारी एक म्हैस व दोन कुत्र्यांचा देखील या विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. ७ नोव्हेंबर रोजी मयत शिवगोंडा पाटील हे आपल्या मालकीच्या ६ म्हैशी व दोन कुत्रे घेऊन राजगोळी गावच्या कल्लापा पाटील यांच्या मालकीच्या शेती गट नं 757 मध्ये म्हैसी चारणे साठी गेले होते. त्या ठिकाणी गणेशवाडी फिडरच्या वाहणाऱ्या विद्युत खांबावरील पोल विद्युत तार तुटून इलेक्ट्रीक शॉक लागून त्यामध्ये शिवगोंडा पाटील व त्यांची जव्हारी जातीची म्हैस व दोन पाळीप कुत्रे असे अंदाजे 70,000 रुपये किमतीचे नुकसान झाले. यासंदर्भातील बसगोंडा पाटील यांनी कोवाड पोलिसात वर्दी दिली असून अकस्मात मयत म्हणून 62/ 2024 बी एन एस एस 194 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पो हे कॉ जमिर मकानदार करत आहेत.
No comments:
Post a Comment